
प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
ढाणकी
सध्या उन्हाची दाहकता जाणवत असून सकाळी थंडी आणि दुपारच्या उष्ण वातावरणामुळे विचित्र पर्यावरणाच्या मायावी रूप धारणेमुळे सर्वसामान्य हैराण असतानाच दुपारच्या वेळेला उन्हाच्या कडाक्याचे चटके सर्व सामान्यांना जाणवत आहे. तसे बघता जंगलातील पानओठे कोरडे ठाक पडत असल्यामुळे जंगल भागात स्वार व वावरणारी हिंस्त्र प्राण्यांची जत्थे लहान वाड्यावस्त्या कडे येताना बघायला मिळत आहे व त्यांच्या अशा प्रकारे येण्यामुळे सर्वसामान्य जनता व जंगल भागाशी निगडित असलेली गावे व शेती करून व मोलमजुरी करणारा मजूर वर्ग धासस्तावला आहे
ढाणकी पासून जवळच मेट गाव असून येथील सर्वसामान्य बहुतांश लोकांचा घरगाडा व गुजरान हे शेतीवर चालत असते असे असताना येथील सर्वसामान्य शेतकरी शेतावर जायला भयभीत होत असून काही दिवसापूर्वी मेट शेत शिवारात गाईवर हल्ला करण्याच्या काही घटना घडल्या असून यामुळे सर्वसामान्य शेतकरी चिंतेत तर आहे शिवाय यावर वनविभागाने परिसरातील पानओठ्या कडे पुन्हा लक्ष देणे जरुरी असून जंगली श्वापद हे मानव वस्तीकडे पाण्यासाठी येत आहे का?? याचा सुद्धा अभ्यास करून पाण्यासाठी वाड्यावस्त्या कडे येत असल्यास वनविभागाने पाण्याची उपलब्धता करून देऊन मानव वस्तीकडे प्राण्यांची येणे कमी होईल अशी सुद्धा जनचर्चा आहे तसेच सध्या कोरडवाहू शेतीचे कामे करण्यासाठी मजूर वर्ग व शेतकरी सुद्धा भल्या पहाटेच जात असतो कारण येणाऱ्या काळात उष्णतेचे प्रमाण अधिक जाणवेल म्हणून पण सकाळी सुद्धा मेट, गोविंदपुर शिवारातील शेतकरी कामाला जाताना जीव मुठीत धरून जात आहेत तसेच अनेक शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसात आपली जनावरे घरी आणण्यापेक्षा शेत शिवारातच बांधतात शेतातील पिके शेतकऱ्यांच्या घरी आल्याकारणाने जनावरांना चरण्यास अनेक शेती खुली झाली त्यामुळे अनेक शेतकरी आपली दूध व कामाला येणारी जनावरे शेतातच बांधतात पण वाढत्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी आपली दूध देणारी व शेती योग्य काम करणारी महागडी जनावर शेतात सुद्धा बांधायला धजावत नाहीत त्यामुळे त्यांची त्रेधा तिरपीट होताना बघायला मिळत आहे काही दिवसापूर्वी मोजा गोविंदपुर येथे बिबट्याने हल्ला करून एका म्हशीच्या पिल्लाला ठार केले तर एका तरुणावर काही दिवसापूर्वी अस्वलाने हल्ला केला तर मेट शेत शिवारात बिबट्याने हल्ला करून दोन जनावर ठार केल्याने मेट व गोविंदपूर येथील शेतकरी मात्र चांगले धास्तावलेले असून वनविभागाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलल्या जात आहे व वनविभागाने याची तरतूद करणे जरुरी आहे व येत्या काळात उन्हाची दाहकता अधिक जाणून जंगली श्वापदे अनेक मानववस्त्या कडे आगेकूच करतील तसेच कृत्रिम पानवट्याकडे सुद्धा कृष्णापुर क्षेत्रात वनपरिक्षेत्र दुर्लक्षित धोरण अवलंबत आहे का..?
