
सहसंपादक :: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका ग्राहकपंचायतच्या तीन वर्षीय कार्यकारिणीची घोषणा राळेगाव येथे नुकतीच करण्यात आली यात राळेगाव तालुका ग्राहक पंचायत च्या अध्यक्षपदी प्राचार्य मोहन देशमुख त्यांची नियुक्ती करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर अश्विनी थोडगे आणि विनय मुनोत यांची नियुक्ती करण्यात आली तर सचिव पदी गोपाल बुरले यांची नियुक्ती झाली . विविध पदे पुढील प्रमाणे सहसचिव हेमंत निंबुळकर,प्राध्यापक गजानन घुंगरू कोषाध्यक्ष भूपेंद्र करिया,महिला प्रमुख भावना खनगन,कार्यालय प्रमुख गजानन काळे,प्रचार प्रसिद्धी प्रमुख राजेश काळे, विधी आयाम प्रमुख पूनम पुणे वार,पर्यावरण प्रमुख नंदकुमार टिपणवार,आयटी सेल प्रमुख सुरेश प्राचार्य सुरेंद्र ताठे, रोजगार सृजन प्रमुख अमर ठाकरे,कार्यकारिणी सदस्य प्रतीक बोबडे, सौ माधवी डाखोरे,एडवोकेट वैष्णवी मुके,एडवोकेट रोशनी वानोडे कामडी,सचिन एकोणकार, सुमित राऊत
या वेळी डॉ. के एस वर्मा यांची जिल्हा कार्यकारिणीवर दुसऱ्यांदा व शोभाताई इंगोले यांचे प्रांत कार्यकारिणीवर पहिल्यांदा निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ग्राहक पंचायत चे प्रांताध्यक्ष प्राचार्य नारायण मेहेरे,जिल्हाध्यक्ष अनंत भिसे,विदर्भ प्रांत सहकोषाध्यक्ष संतोष डोमाळे, जिल्हा सहसचिव जिनेन्द्र बंगाले,उपजिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर कैलास चंद्र वर्मा प्रांत कार्यकारणी सदस्य शोभाताई इंगोले तसेच वडकी, खैरी,झाडगाव, राळेगाव, येथील ग्राहक पंचायत चे कार्यकर्ते उपस्थित होते
