
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 2 जुलै 25 रोजी रामतीर्थ येथील मुलीचा होणारा बालविवाह जिल्हा व तालुका प्रशासनाच्या सर्तकतेमुळे रोखण्यात आला. रामतीर्थ येथे बालविवाह होत असल्याबाबतची माहिती श्री अविनाश पिसुरडे सरंक्षण अधिकारी संस्थात्मक यांनी
श्री सागर विठाळकर बालविकास प्रकल्प अधिकारी राळेगाव यांना माहिती दिली, ताबडतोब ही माहिती मा. अमित भोईटे सर तहसीलदार राळेगाव , गटविकास अधिकारी मा. केशव पवार सर यांना देण्यात आली. तसेच मा. विशाल जाधव सर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा उपमुख्य कार्यक्रम अधिकारी यवतमाळ तसेच देवेंद्र राजूरकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना माहिती दिली त्यांनी ताबडतोब अविनाश पिसुरडे सरंक्षण अधिकारी संस्थात्मक यांना टिमसोबत रामतीर्थ येथे दिनांक 1 जुलै 25 ला पाठविले,सपुर्ण टिम गावामध्ये दाखल झाली. सर्वांना याबाबतीत मार्गदर्शन करुन नोटीस बजावण्यात आली.
यावेळी सागर विठाळकर बाल विकास प्रकल्प अधिकारी,अविनाश पिसुरडे, तसेच ग्रामपंचायत अधिकारी शुभम राठोड,सरपंच श्रीकांत महाजन, अश्विनी नासरे चाईल्ड लाईन सुपरवायझर,ओम धारणे पोलीस विभाग,रमेश मडावी यांची उपस्थिती होती.
मुलगी व मुलीचे आई वडील यांची प्रशासनाने तसेच गावातील नागरिकांनी समजूत घातली, बालविवाहाचे दुष्परिणाम समजाऊन सांगितले त्यामुळे आई वडील यांनी स्वखुशीने विवाह न करण्याबाबत निर्णय घेतला.त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व नागरिकांनी देखील बालविवाहा सारख्या चुकीच्या प्रथेपासून दूर रहावे असे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
स्थानिक प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बाल विवाह रोखण्यात आला.
