
प्रतिनिधी,प्रवीण जोशी
ढाणकी.
दत्त जयंती निमित्त यात्रा भरण्यात आली त्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ म्हणून ओळखला जातो. बैलगाडा शर्यती मध्ये कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा न करता व कसल्याही प्रकारची लालसा न बाळगता धुरेकरी आपल्या जीवाची परवा न करता जीव मुठीत ठेवून बैलगाड्या शर्यत खेळली जाते. बैलगाडा शर्यतीमध्ये आपल्या जोडीला बैल मालक हा लाखो रुपये खर्च करतो व आपल्या जोडीची निगा राखतो. बैल जोडी मालकाचा ‘नादच खुळा’ असे म्हणायला वावगे ठरणार नाही. बैलाला छकड्याला लावताच बैलाच्या अंगात एक ऊर्जा निर्माण होते व तो आपल्या मालकाला शर्यत जिंकून देण्याचा प्रयत्न करतो. ढाणकी येथे अशा अनेक प्रकारच्या जोड्या पहावयास मिळत होत्या तसेच बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होती. बैलगाडा शर्यती मध्ये मॅगी आणि राणा रा. पारवा ता.पुसद जोडी मालक कौतिक अनिल राठोड ही जोडी प्रथम क्रमांक बक्षीसाचे मानकरी ठरली. तर द्वितीय बक्षीस कू.संस्कृती गिरीश माने रा.पारवा ता.पुसद ही जोडी ६.८ सेकंद मध्ये आली . बैलगाडा शर्यत पाण्यासाठी प्रचंड गर्दी असताना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला व पोलिसांनचा सुद्धा चोख बंदोबस्त होता पोलिस प्रशासन यांनी आपली कामगिरी अतिशय जोमाने जोपासली. आपले कर्तव्य पार पाडले. कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता अतिशय शांततेत बैलगाडा शर्यत पार पडली.
