
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
श्री सत्यसाई शिक्षण व प्रशिक्षण संस्था संचालित सैनिक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज वडकी येथील नऊ विद्यार्थ्यानी आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या दुसऱ्या फेरीतील नेल्टास स्पर्धा परीक्षेत सुयश प्राप्त केले असून शाळेच्या वतीने नुकताच या यशस्वी विद्यार्थ्यांचा मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य सचिन ठमके होते.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रणधीरसिंह दूहान यांच्या शुभहस्ते अंतरराष्ट्रीय नेल्टास परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये देवयानी पालकर, वेदांत ठाकरे, आचल भोयर, कार्तिकी कोंबे, ओम निशाणे, सर्वस्वी सोनटक्के, अनुष्का डाहतट,धम्मदिप बेलेकर व अथरव मुंगणे या विद्यार्थ्यांचां सहभाग होता.याप्रसंगी संस्था सचिव सत्यवान सिंह दुहान, शाळा प्रशासक भरत सिंह दूहान, राकेश सिंह दूहांन,परीक्षा विभाग प्रमुख शेखर नंदूरकर सहित सर्व अध्यापक, अध्यापिका, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
