
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
शेतकरी महिला आघाडी व रावेरी गावक-यांचे वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा ‘ सितानवमी ” चे पावन पर्वावर ज्या महिलांचे पतीच्या मृत्यू नंतर विधवा किंवा घटस्फोटित, परितक्त्या म्हणून जिवन जगतानी, त्यांनी स्वकर्तृत्वावर मुला, मुलींना घडविले, समाजात एक प्रतिष्ठीत नागरिक बनविले, समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली, त्या महिलांचा ” स्वयंसिद्धा महीला ” चा सन्मान देवून त्यांचा गौरव करण्याचा कार्यक्रम देशातील एकमेव ‘ सिता मंदीर, रावेरी ता. राळेगांव जि. यवतमाळ येथे आयोजित केला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अॅड वामनराव चटप, प्रमुख उपस्थिती़ शेतकरी संघटने च्या माजी अध्यक्षा, माजी आमदार सौ सरोजताई काशीकर, स्वभापचे चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अनिलभाऊ घनवट, शेतकरी संघटने चे अध्यक्ष, श्री ललीतदादा बहाळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ प्रज्ञाताई बापट, युवा आघाडी अध्यक्ष, श्री सुधीर बिंदू, स्वभाप महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती सिमाताई नरोडे, स्वभाप चे प्रदेशाध्यक्ष, श्री मधुसूदन हरणे, युवा आघाडी चे माजी अध्यक्ष श्री सतिश दाणी, हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख, रावेरीचे सरपंच श्री राजेंद्र तेलंग, यांचे उपस्थित संपन्न होणार आहे.
रामायणातील वर्णना नुसार प्रभु रामचंद्राने सिते ची अग्नी परिक्षा घेतल्या नंतर सुध्दा काहीं च्या आरोपामुळे निरपराध गरोदर सिते ला वनवासात सोडल, एका राज्याची राणी असून सुध्दा निरपराध सितेने वाल्मीकी ऋषी च्या आस-याने, भिक्षा मागून जिवन जगत ” लव, कुश “या दोन शूरवीर मुलांना जन्म दिला, त्यांचे योग्य पालनपोषण व संस्कार देवून प्रभू रामचंद्रांचे अश्वमेध यज्ञातील दोन अश्वांना बांधून ठेवत ” प्रभू रामचंद्रांचे सेने ला पराभूत करून आपली अबला सिते च्या लवकुशांनी अबाला मातेचा सन्मान ज्या ठिकाणी केला, त्याच ऐतिहासिक जागेवर वसलेल्या रा़वेरी येथील सिता मंदीरात आज अबला, निराधार मातांनी आपल्या पाल्यांना विपरीत परिस्थितीत योग्य पालनपोषण व संस्कार देवून समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली, म्हणून त्या ९ महिलांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती सिता नवमी उत्सव मंडळ च्या वतीने प्रसिध्दी पत्रका द्वारे देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रेखा हरणे, मनोरमा मुटे, अल्का दाणी, रेखा काकडे, उषा दरणे, अश्विनी धाडवे, वर्षा तेलंग, राजश्री झोटिंग, माया पुसदेकर, ज्योत्स्ना मोहितकर तसेच शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झोटिंग, श्री नामदेवराव काकडे, गणेश मुटे, सतीश दानी, सारंग दरने, मुकेश धाडवे, विनोद काकडे, उद्धव चौधरी, महेश सोनेकर, विजय पाल यांचे अनमोल सहकार्य मिळत आहे.
