
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
भाजपची विविध पदाची कार्यकारणी गठित करण्यात आली यावेळी संतोष तिरमकदार
याची वर्णी भाजपाच्या तालुका ग्रामीण मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून शैक्षणिक क्षेत्रात त्यांची मोठी कामगिरी, उत्कृष्ट सूत्रसंचालन, वक्तृत्व आणि विविध सामाजिक शैक्षणिक कार्यात सक्रिय सहभाग या सकारात्मक बाबीं मुळे त्यांना ही जबाबदारी पक्ष वरिष्ठांनी दिली असावी. यापूर्वी युवा मोर्चा उमरखेड तालुकाध्यक्ष, ढाणकी शहर सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्यांचा यशस्वी अनुभव पाठीशी असल्याने भविष्यातील निवडणुकीत पक्षाचे यथोचित काम करून तालुक्यातील सर्वच ठिकाणी पक्षाची ताकद वाढवून जी जबाबदारी व विश्वास टाकला तो सार्थ ठरवून दाखवू असे यावेळी संतोष म्हणाले. त्यांचेवर ही जबाबदारी तालुका अध्यक्ष सुदर्शन रावते पाटील यांनी टाकली.
