
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील भाजपा तालुकाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया दिं. २० एप्रिल २०२५ रोज रविवारला पार पडली असून यात एकमताने छायाताई पिंपरे यांची एक मताने निवड करण्यात आली आहे.
भाजपाच्या निर्भीड, निपक्ष आणि घराणेशाही ला फाटा देऊन…. समाजातील तळागाळातील लोकांनकरिता कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना मान आणि सन्मान देणारा पक्ष म्हणून भाजपा पक्ष प्रसिद्ध आहे आणि याचं विषयची प्रचिती आज राळेगाव भाजपा अध्यक्ष निवडीवेळी दिसून आली विशेष म्हणजे राळेगाव तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एक कर्तृत्वान महिला, यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली कारण राळेगाव नगरपंचायत मधे गट नेत्या म्हणून ज्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य केल्याची पोचपावती त्यांना मिळाली असून त्यांना तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडी प्रसंगी माजी जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ डांगे अध्यक्ष स्थानी होते तर सूचक म्हणून प्रशांत भाऊ तायडे (माजी प. स. सभापती )… तथा पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी तालुका अध्यक्ष . रंजन दादा कोल्हे ,संदीप तेलंगे ,एडवोकेट प्रितेश वर्मा, सुधाकर गेडाम, रुपेश बोरकुटे, गणेश देशमुख, गोपाल मशरू, शुभम मुके, प्रफुल कोल्हे, निखिल राऊत, निलेश घिनमिने,उपस्थित होते.*
