
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर
यावर्षी पाऊस तालुक्यात सरासरीपेक्षा पडला असून सातत्याने पर्जन्यवृष्टी होत राहिल्याने भूजल पातळीत चांगलीच सुधारली त्यासाठी पाणी व्यवस्थापनाला पर्याय नाही जेणेकरून उन्हाळ्यातही सिंचनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होईल या करिता ओढे-नाल्यांमधील वाहून जाणारे पाणी रोखण्यासाठी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधकाम मोहीम कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असून दिं ४ नोव्हेंबर २०२२ रोज शनिवारला सोनूर्ली येथे तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी,मंडळ अधिकारी राजू ताकसांडे, सरपंच सौ.संजिवणी शेडमाके, गणेश कोरडे, विलास डंभारे, सुरज भोयर ,गुणवंत भोयर माणिक भोयर तसेच कृषी सहाय्यक मासाळ ,मेश्राम, मुळाटे ,भुरके कर्मचारी यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे .
कृषी विभागाच्या वतीने वनराई बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली असल्याने पाणीटंचाईवर काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो वनराई बंधाऱ्या करिता पाणलोट क्षेत्राची अट नसते त्यासाठी तांत्रिक निकष विचारात घेऊन जागेची निवड करणे लाभदायक असते प्रथम नाल्याची पाहणी करून कमीत कमी खर्च जास्तीत जास्त जलसाठा करणे शक्य होईल अशी जागा निवडली जाते नाला अरुंद व खोल असावा साठवण क्षमता पुरेशी असावे नाल्याच्या तळाचा उतार सर्वसाधारणपणे दोन ते तीन टक्के असावा लागतो या बंधाऱ्याची उंची दीड मीटर पेक्षा जास्त नसावी वनराई बंधाऱ्यामुळे आजूबाजूच्या असलेल्या विहिरीच्या भूजल पातळीत वाढ होण्याकरिता मदत होते वनराई बंधाऱ्याच्या जलसाठ्यांमधून पाण्याचा उपसा करून रब्बी व उन्हाळी हंगामात भाजीपाला कडधान्य तृणधान्य यासारखी पिके घेण्यासाठी मदत होते तसेच अपेक्षित संरक्षित सिंचित होऊ शकते त्याचप्रमाणे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होते. त्याकरिता वनराई बंधार्याच्या माध्यमातून बिगर पावसाळी हंगामातील पाण्याची गरज काही प्रमाणात भागविण्यासाठी सिमेंट व खतांच्या रिकाम्या गोणी, माती वाळूचा वापर करून पाण्याचा प्रवाह अडविण्यात येतो. त्याचा परिसरातील शेतकर्यांना लाभ होत त्याकरिता कृषी विभागाच्या वतीने वनराई बंधारे बांधकाम करण्याची मोहीम हाती घेतली असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
