
प्रतिनिधी:संदीप जाधव,उमरखेड
नगरपालिका ढाणकी येथील कचरा व घराघरातील उर्वरित अन्न, मेलेली कुत्रे, कोंबडी, बकरी, गाई , मांजर,अशा टाकाऊ मुदत संपलेल्या वस्तू, घरामधील फेकण्याजोगा वस्तू हे नगरपालिका ढाणकी जवळ तीन किलोमीटर अंतरावर खरुस गावाच्या पाठीमागे, इ क्लास ची रिक्त जमीन आहे त्याच्या औरत चौरस उत्तम दर्जाची शेती आहे, उन्हाळ्यामध्ये अवधानात इकडे तिकडे पडण्यावरून जवळपासच्या शेतामध्ये नांगरणी करण्यासाठी त्रास होत आहे.व पावसाळ्यात फेकलेल्या वस्तूच्या दुर्गंधीमुळे जवळपासच्या शेतकरी वर्गाला शेतामध्ये आणलेलं भोजन खाता येत नाही, या कचऱ्याचा दुर्गंध येतो, व शेतकऱ्यांनी महानगरपालिका च्या सेवकांना सांगूनही मोकळ्या मैदानावरती कचरा फेकत आहे, याचा नाहक त्रास शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भोगावे लागत आहे.
