तुरीचे कट्टे घेऊन जाणारा ट्रक पलटी,वडकी येथील घटना

सहसंपादक : रामभाऊ भोयर

आंध्रप्रदेशातील करनुल येथून नागपूरकडे तुरीचे कट्टे भरून जात असलेला ट्रक पलटी झाल्याची घटना दी २७ डिसेंबर च्या मध्यरात्री २ च्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील वडकी येथे घडली.
ट्रक क्रमांक एपी २१ टी झेड ४९१४ हा आंध्रप्रदेशातील करनुल येथून नागपूर कडे तुरीचे कट्टे घेऊन वडकी मार्गे जात होता. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील वडकी गावाजवळ मध्यरात्री ट्रक चालकाचे स्टेरिंग वरील नियंत्रण सुटले व ट्रक डिव्हायडर तोडून मध्यभागी पलटी झाला.या ट्रकमध्ये तुरीचे सुमारे २०० कट्टे होते. सुदैवाने या अपघातात कोणतीच जीवितहानी झाली नसून
मात्र ट्रक चालक सुभारेड्डी व सोबत असलेला साथीदार वलीभाई यांना थोडाफार किरकोळ मार लागला आहे.सोबतच ट्रकचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच वडकी पोलिस व एन एच आयच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत केली़