
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव शहरातील महाकाल ग्रुप तर्फे आज कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्रावण महिन्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर श्रावण महिना मोठा उत्साहात साजरा करण्यात येतो यावेळेस श्रावण महिन्याचा शेवटला सोमवार म्हणून यावेळेस महाकाल ग्रुप तर्फे कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते ही कावड यात्रा सर्वप्रथम राळेगाव येथून निघून सरळ वर्धा जिल्ह्यातील खटेश्वर येथील प्राचीन महादेव मंदिर वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या महादेव मंदिराच्या वर्धा नदीचे पाणी घेऊन ही कावड यात्रा घेऊन युवक सरळ राळेगाव शहरात पादळ आले व त्यानंतर राळेगाव शहरातून भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते ही कावड यात्रा शहरातील प्रमुख मार्गाने जाऊन सर्वप्रथम राळेगाव शहराचे ग्रामदैवत असलेले माता मंदिर येथे त्या कावड मधले पाणी हे त्या मंदिरात अर्पण करण्यात आले व त्यानंतर संपूर्ण राळेगाव शहरातील प्रत्येक मंदिरात यात्रा जाऊन त्या ठिकाणी कावड मधले पाणी घेऊन ते संपूर्ण मंदिरात अर्पण करण्यात आले या कावड यात्रेचे आयोजन राळेगाव शहरातील महाकाल ग्रुप कडून करण्यात आले होते.
