
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील एकूर्ली येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा एकूर्ली येथे ७५वा स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आला. कोविड -१९ च्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून स्वतंत्रता दीन साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री. अनिलराव वरुडकर सर, अमृताताई वाघमारे, व अर्चनाताई शेळके आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री उत्तमभाऊ चौधरी, उपाध्यक्ष श्री बंडुजी वानखडे, व प्रमोदराव चौधरी,प्रमोदराव कुडे, इतर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच ग्रामसेवक निवल साहेब, सरपंच सौ पुष्पाताई कुमरे उपसरपंच सोनुताई कुटे,मधुकरराव आत्राम, नजीर खा पठाण व इतर ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील हेमराजजी बोडे अंगणवाडी सेविका उषाताई चीखलकार, आशासेविका संगीता पुसनाके गजुभाऊ नखाते,विनोदराव तोडासे व इतर गावकरी उपस्थित होते.
