शेतकरी संघटना करणार खडकी येथे प्रतिबंधीत कापूस बियाण्याची लागवड

सहसंपादक:- रामभाऊ भोयर

दिनांक २१ जुन २०२३ ला दु.१२ वा. शेती तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळावा व एच टी बी टी कापूस लागवड
केंद्र शासनाने यावर्षी एच टी बी टि च्या लागवडीसाठी त्या राज्यांना ट्रायल परमिशन घेण्याच्या दृष्टीने पत्र मागितले होते, परंतु तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यात प्रामुख्याने कापूस होत, असताना सुद्धा यांनी कोणत्याही प्रकारचे नवीन तंत्रज्ञान घेण्याच्या दृष्टीने लागवडीस परवानगी दिली नाही. मागील 2008 साली जे तण प्रतिबंधित बियाणे भारतात शेतकऱ्यांना लागवडीसाठी मिळणार होते, ते बियाणे आजही शेतकऱ्यांना लागवडीसाठी मिळत नाही. याचा निषेध म्हणून व नवीन तंत्रज्ञान गुलाबी बोंड अळीला नियंत्रित करणारे क्रॉप वन वन ए आय ही तंत्रज्ञान. भारत हैदराबाद स्थित श्रीराम बायोटेक या कंपनीने सुद्धा गुलाबी बोंड अळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने प्रयोग शाळा ट्रायल यशस्वी केल्या आहे.
त्या ट्रायल भारतातील चार राज्यात घेण्याच्या दृष्टीने त्यांनी परवानगी मागितली होती ,परंतु तेलंगणा, महाराष्ट्र ,गुजरात सरकारने कापूस उत्पादक भागात या ट्रायल नाकारल्या, याचा निषेध म्हणून यवतमाळ जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने खडकी (वडकी) ता.राळेगाव येथे दु १२ वा तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळावा व एच टी बि टी कापूस लागवड आंदोलन होणार आहे. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे नेते अँड वामनराव चटप (माजी आमदार), शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललितदादा वहाळे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. सी डी मायी आणि स्वतंत्र भारत पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मधुसूदन हरणे हे नेतृत्व करणार असून शेतकरी संघटना यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र झोटिंग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विस्तार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद दामले , महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा प्रज्ञाताई बापट, विजय निवल, सतिश दानी,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सोनाली मरगडे,देवराव पाटील धांडे, दशरथ पाटील , भास्करराव महाजन, वर्धा जिल्हा अध्यक्ष उल्हास कोटमकर, गणेश मुटे, सारंग दरणे, दत्ताजी राऊत, धोंडबाजी गावंडे, मुकेश धाडवे, डॉक्टर इसनकर, अरविंद राऊत, हेमराजजी ईखार, देवेंद्र राऊत, दीपकअन्ना आंनदवार, चंद्रशेखर देशमुख, बालाजी पाटील काकडे, इदरचंद बैद,बंडूजी येरगुडे, किसनराव पावडे, बबनराव ठाकरे, दशरथ खैरे, हेमंत ठाकरे,गजानन ठाकरे, युवा आघाडी चे अक्षय महाजन, गोपाल भोयर,विक्रम फटींग, सुरेश आगलावे, यांच्या सह जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते युवा आघाडी कार्यकर्ते, महिला आघाडी सह शेतकरी सहभागी होतील. अशी माहिती यवतमाळ जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना राजेंद्र झोटींग यांनी दिली.