
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 24/12/2022 रोज शनिवारला शालेय परिसरात वर्ग 12 कडून ग्राहक दिन साजरा करण्यात आला.त्यावेळी त्या कार्यक्रमात या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्ग 12 वी च्या वर्गशिक्षिका सौ.वंदना वाढोणकर यांनी करून ग्राहकदिनाचे महत्त्व समजावून सांगितले.बोलताना म्हणाल्या की* ग्राहक सुरक्षा कायद्याची जनजागृती होणे गरजेचे+ असल्याचे सांगून प्रास्ताविक आटोपते घेतले.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ शिक्षक रमेश टेंभेकर सर यांनी ग्राहक दिनाचे महत्त्व समजावून सांगितले.कार्यक्रमाचे शेवटी विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड सर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजय चौधरी यांनी केले. तर कुंदा काळे यांनी आभार मानले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पदार्थांचे लावलेल्या स्टालचे फित कापून प्राचार्य सरांनी रितसर उद्घाटन केले. उद्घघाटन झाल्यावर विद्यार्थ्यांनी आपापल्या पैशांनी वस्तू खरेदी करून आनंद घेतला. या कार्यक्रमात शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्गशिक्षिका वंदना वाढोणकर यांनी अथक परिश्रम घेतले.
