पर्यावरण संवर्धन व विकास समिती तर्फे 26फेब्रुवारी 2023 ला समुद्रपूर येथे विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन

     राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर 

देशात पर्यावरण व प्रदूषण हे अतिशय व्यापक व तितकेच वैधानिक व अभ्यासाचे विषय असल्याची आम्हाला जाणीव आहे. परंतु मानवी जीवन व प्राण्यांशी, पशु पक्षांशी संबंधित अस्तित्वाचे ते जैविक प्रश्न आहेत. म्हणून त्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही या पर्यावरण संमेलनाचे आयोजन करीत आहोत.
या विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलनासाठी उदघाटक म्हणून हिंगणघाट- समुद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.समिरभाऊ कुणावार उपस्थित राहणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे प्रदेश अध्यक्ष दलित मित्र व आदिवासी सेवक माननीय डी.के.आरीकर तर विशेष अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री मा.अशोकभाऊ शिंदे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.सुधीर बाबू कोठारी साहेब महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे, माजी केंद्रीय मंत्री मा.सुबोधजी मोहिते,माजी आमदार मा. राजूभाऊ तिमांडे,श्रीमती उषाकिरण थुटे अध्यक्ष, ग्रामीण विकास संस्था,समुद्रपूरच्या नागराध्यक्षा योगिताताई तुळणकर, माजी मंत्री मा. सूर्यकांत गवळी,अतुल वांदिले हिंगणघाट, राजूभाऊ चाफले, उमेशभाऊ तुळसकर तर प्रमुख अतिथी म्हणून आनंद काटोले उप्प्रादेशिक अधिकारी म. प्र. नि. मं. वर्धा, देवा तांबे, गुणेश्वर आरीकर, हरीश ससणकर, श्रीमती सुरेखाताई रडके विदर्भ अध्यक्ष, विजयाताई धोटे, हर्षल गायकवाड मुख्याधिकारी समुद्रपूर, भूपेंद्रजी शहाणे,राजेश बकाने, यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
पर्यावरण संमेलनात पर्यावरण मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पर्यावरण मित्र व पर्यावरण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तर गुणवंत विध्यार्थी, कर्मचारी, अधिकारी आणि विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा सन्मान पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असून अनुभवी व्यक्तींचे सुद्धा मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच निबंध स्पर्धा घेण्यात येणार असून त्यांना सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
तरी येत्या 26 फेब्रुवारी 2023 ला
समुद्रपूर जि. वर्धा येथे होणाऱ्या विदर्भ स्तरीय पर्यावरण संमेलनाला मोठया संख्येनी पर्यावरण प्रेमिनी उपस्थित राहावे असे आवाहन पर्यावरण संवर्धन शालिनी महाकुलकर,अनुराधा जोशी,व विकास समितीचे सचिव हरीश ससणकर, विदर्भ अध्यक्षा श्रीमती सुरेखा रडके,खेमचंद मेश्राम,स्वाती दुर्गमवार, प्रवीण जुमडे,सुरेश शर्मा,अनुपमा भुजाडे, सुधाकर मोकदम, नंदा शेरकी,विनोद सातपुते जिल्हाध्यक्ष, विनोद दोंदल,महासचिव समीक्षा मांडवकर, विभागीय संघटक महेंद्र शिरोडे, श्रीकांत पाल, अमृतलाल राठी,वर्षा कोठेकार, राणी राव,दिनेश एकवणकर,भरत कूकडे,राहूल काहुरके, डॉ.गणेश बाहादे, नमिता पाठक,पंकज दोडके, गजानन जिकार, विजया रोकडे, यवतमाळ जिल्हा संघटक मनोहर बोभाटे , जिल्हा सचिव प्रकाश खुळसंगे, जिल्हा मार्गदर्शक गंगाधर घोटेकर,राळेगाव तालुकाध्यक्ष दीक्षा नगराळे,गजेंद्र थूने यांनी केले आहे.