प्रतिनिधी ::प्रवीण जोशी
ढाणकी
अनेक मातब्बर नेत्यांच्या मल्टिस्टेट पतसंस्था ढानकी शहरात आहेत त्यांचा सामाजिक उपक्रम असतो असे ते विविध कार्यक्रमात सांगत असतात व ते त्याचे सामाजिक जे कार्यक्रम असतात ते खातेदारांच्या पुस्तकावर ठसठशीत अक्षरात लिहून असते पण ते फक्त ढाणकी शहरासाठी केवळ कागदावरच आहे की काय असा प्रश्न जनसामान्यांना पडतो.
आरडी एजंट मार्फत दैनंदिन वसुली करून रक्कम गोळा करणे विविध माध्यमातून जास्तीजास्त सभासद बनवून त्यामधून भांडवल उभे करणे आणि जनतेच्या पैशावर स्वतःचा
मोठेपणा आणि पुरस्कार मिळविणे एवढाच उद्योग आहे की काय असा गहण वास्तव त्यांच्या मागील केलेल्या केवळ कागदावरील उपक्रमांमधून दिसते. ढानकी येथे उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असताना मातब्बर नेत्यांच्या मल्टिस्टेट पतसंस्थने कोणत्याही प्रभागात जाऊन पाणी टंचाई जाणून घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. किंवा आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या होतकरू हुशार विद्यार्थ्याला दत्तक घेऊन त्याचा शैक्षणिक खर्च उचलला नाही किंवा शहरातील मोक्षधाम येथील सुधारणा करण्यासाठी स्वतः च्या लाभांशामधून काही भाग दिलेला ऐकीवात नाही. याच महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असताना ढानकी शहरासह आजुबाजूच्या गावखेड्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला त्यानुसार अनेक दानशूर व्यक्तींनी दैनंदिन लागणारे जिन्नस देऊन मदत करण्याचा प्रयत्न केला मदतीचा विडा उचलला. मात्र नेत्याच्या मल्टीस्टेट पतसंस्थांनी कुठल्याही प्रकारची मदत करताना बघायला मिळाले नाही ही विशेष बाब.
यांच्याकडून काही हजाराचे जरी कर्ज काढावयाचे असल्यास अनेक दस्तऐवजावर स्वाक्षऱ्या कराव्या लागतात तेव्हा कुठे उपकार केल्या सारखे पैसे देतात.
ढानकी येथील एका नामांकित ठिकाणाने केवळ ठेवी घेणे कर्ज न देणे असा चंग बांधला की काय असा यक्षप्रश्न पडतो. काही गहाण ठेवल्या नंतर लगेच ग्राहकाच्या मालमत्तेवर पतसंस्थेचा बोजा उतरविला जातो संपूर्ण तो कागदपत्रे सोपस्कार झाले की नाही इथपर्यंत पाठपुरावा केला जातो. ग्राहकांना अटी शर्ती हे सगळे घालून दिलेले असते पण पतसंस्थांना काही नियम आहेत का नाही हाच प्रश्न पडतो. ज्या ग्राहकाने ज्या ठिकाणी ठेव ठेवली आहे त्या पतसंस्थेच्या व्यक्तिगत भांडवलावर सुद्धा ग्राहकाचा बोजा यायला हवा व शासनाने सुद्धा जेवढं त्यांचं भांडवल आहे तेवढेच ठेव ठेवून घेण्याची मर्यादा लावून दिली तर येणाऱ्या काळात फसगतीला आळा बसू शकते.वर्षातून एकवेळा येऊन आपल्या अमोघ वक्तृत्वाचा वर्षाव करून आणि छटाक भर साखर व खेळ खेळून सामाजिक दायित्व दाखवणारेच आतापर्यंत शहराने बघितले.यांच्या कर्जाचे व्याज दर सुद्धा मोठ्या प्रमाणात असते.त्यामुळे या स्वार्थी जमातीची वागणूक जनतेच्या सुद्धा हळू हळू लक्षात येत आहे.
