महाराष्ट्र सरपंच संघटनेची यवतमाळ जिल्हा कार्यकारणी घोषित, विदर्भ सरचिटणीस पदी सुधीर जवादे तर जिल्हा अध्यक्ष पदी तुकाराम माथनकर यांची निवड करण्यात आली

सहसंपादक : रामभाऊ भोयर

महाराष्ट्र सरपंच संघटनेची जिल्हा बैठक जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे प्रा राजेंद्र कराळे प्रदेश अध्यक्षतेखाली व ॲड देवा पाचभाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या बैठकी मध्ये सर्वानुमते सुधीर जवादे महाराष्ट्र सरपंच संघटनेच्या विदर्भ सरचिटणीस पदी निवड करण्यात आली तर तुकाराम माथनकर यांची यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर जिल्हा महिला अध्यक्ष पदी सविता जाधव,जिल्हा उपाध्यक्ष पदी जयवंत गहाणे,जिल्हा सचिव पदी योगेश राजूरकर,जिल्हा संपर्क प्रमुख उमेश चव्हाण,जिल्हा संघटक पदी राजू इदे,जिल्हा समन्वयक पदी निलेश पिंपळकर, जिल्हा कोषध्यक्ष पदी गीताताई पावडे, यवतमाळ तालुका अध्यक्ष पदी उमेश राठोड, सचिव प्रमोदभाऊ नाटकर,तालुका संपर्क प्रमुख पुरुषोत्तम राठोड उपाध्यक्ष पुरुषोत्तम टीचकुले,तालुका संघटक निरज जाधव आर्णी तालुका अध्यक्ष पदी रमेश चव्हाण, उपाध्यक्ष प्रतिभा वारंगे,सचिव दुर्गा उईके , समन्वयक निलिमा मुळे,संघटक दिनेश चव्हाण यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र सरपंच संघटना यवतमाळ सरपंच आणि ग्रामपंचायत यांच्या हक्क मागण्यासाठी कायदेशीर व आक्रमक मार्गाने काम करणार असल्याचे विदर्भ सरचिटणीस सुधीर जवादे यांनी बैठकीत सांगितले