
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील अंतरगाव ,जागजई, शेळी परिसरातील नागरीक अनेक दिवसांपासून वाघाच्या दहशतीने भयभीत झाले असतांनाच अशातच दिनांक १८/८/२४ च्या रात्री अंतरगाव येथील निकेश महादेव नेहारे.रा.अंतरगाव यांच्या मालकीचे गाय व बैल हे घराजवळ बांधुन असतांना वाघाने गायीवर हल्ला करून केले गंभीर जखमी. त्यामुळे त्या शेतकऱ्याचे ५० हजाराचे नुकसान झाले आहे.तर वाघाच्या धास्तीने बांधून असलेले बैल पण पळुन गेले.त्यामुळे वनविभागाने शेतकऱ्यांला गाईची नुकसान भरपाई देण्यात यावी.व तातडीने वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी अंतरावर,जागजई ,शेळी, परिसतील नागरिकांचे वनविभागाकडे मागणी होत आहे.कोपरी व येवती रस्त्याने रात्रीच्या वेळेस येणे टाळावे अंतरगाव परिसरामध्ये वाघिणीचे वास्तव्य आहे
तरी रात्री सात वाजेनंतर मोटरसायकल ने प्रवास टाळावा..
