लग्न पत्रिका छपाई झाली महाग, कागद व इतर साहित्य महागाईचा परिणाम.


प्रतिनिधी प्रवीण जोशी
ढाणकी.


ग्रामीण आणि शहरी भागात सध्या लग्न प्रसंग आयोजीले जात आहे. पण लग्न ठरल्यानंतर मसुदा येतो तो लग्न पत्रिकेचा कारण नातेवाईकांना आप्तेष्टांना पारिवारिक जणांना नवीन जुळलेल्या ऋणानुबंधाची माहिती व्हावी यासाठी लग्नपत्रिका छापणे अपरिहार्य असते. त्यामुळे वेळी दोन्ही मंडळींना पत्रिका छापणे अनिवार्य बनते. तरी पण हल्लीच्या इंटरनेटच्या काळात व्हाट्सअप पत्रिकेचे निमंत्रण पाठविले जात आहे.
सद्यस्थितीत परिस्थितीचा विचार केला असता कोरोना काळ संपला असला तरी महागाईचा कुंभमेळा कायम स्वरूपात आहे. अशातच घरोघरी जाऊन मूळ पत्रिका देणे या प्रथेस सुद्धा बगल दिल्या जात आहे. तसेच लग्नपत्रिकेला लागणारे साहित्य कागद व इतर छपाई महाग झाल्याने निश्चितच पत्रिका छपाई थोड्याफार प्रमाणात महाग झाली आहे. असे असताना सुद्धा हा प्रसंग आयुष्यात एकदाच येतो या विचाराने वधू, वर, पक्षांवरील मंडळी महागाईला बाजूला सारून लग्न पत्रिका दर्जेदार स्वरूपात आणि उत्तम छपाई कशा स्वरूपात असेल या विवेचनामध्ये दिसते.
तसेच लग्नपत्रिका आकर्षक स्वरूपात व सगळ्यापेक्षा वेगळी कशी दिसेल याकडे वधू-वरांचा ओढा दिसतो लग्न पत्रिका छापणाऱ्या प्रवीण धणवर यांनी सांगितले की दिवाळीनंतर लग्न प्रसंग सुरू होतात त्या अनुषंगाने लग्न पत्रिका छापण्यासाठी व पत्रिकेचे दर विचारण्यासाठी ग्राहक येत आहेत. सध्या कागदाच्या किमती वाढल्याने पत्रिका छापाई मध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे वर वधू पक्षाकडे मंडळीना या स्वरूपात आर्थिक भार सोसावा लागणार. तसेच लग्न पत्रिकेत वधू आणि वराचे डिजिटल स्वरूपात फोटो येतील अशा प्रकारची नवीन प्रथा सुद्धा समोर येत आहे. तसेच लग्न पत्रिकेत समाजाला पोषक व सकारार्थी संदेश सुद्धा लग्न पत्रिकेत नमूद करण्यात येत आहेत. पत्रिकेमध्ये अनेक नावे टाकण्यापेक्षा सामाजिक संदेश देऊन समाज जागृत कसा होईल या प्रकारचे संदेश टाकण्यात भर दिल्या जात आहे.
….


कोरोना काळात अनेक व्यवसाय डबघाईला आले त्यातील एक व्यवसाय म्हणजे लग्न पत्रिका छापने,तसेच सतत पत्रिका छपाई कागद महाग होत असल्याने छपाई महाग होत आहे. पण आता लग्नसराई पूर्वीप्रमाणे सुरू झाल्याने या व्यवसायाला नक्कीच भरभराट येण्यास मदत होईल.
प्रविण धनवर.
व्यवसायी,पत्रिका छपाई