
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव शहरात शाही संदल निमित्त क्रांतीकारी शहीद भगतसिंग संघटन राळेगाव जिल्हा यवतमाळ तर्फे सामजिक एकता, बंधुता लक्षात घेता राळेगाव येथील क्रांती चौक येथे सर्व मुस्लिम व हिंदू बांधवांना सरबत वाटप करण्यात आले. यावेळी क्रांतीकारी शहीद भगतसिंग संघटनेचे संस्थापक/ अध्यक्ष श्री. निलेश भाऊ हजारे तसेच सर्व संघटनेचे पदाधिकारी यामध्ये मंगेश पिंपरे, रोहित पिंपरे , ॲड. दीक्षांत खैरे, स्वप्नील हजारे, प्रदुमन इंगोले, सूरज गुजरकर, सागर एम्बडवार, संदेश धानोरकर, सागर वर्मा, अनिकेत वनस्कर, सौरव नारनवरे , शुभम ठाकरे, अजय चांदेकर , अंकित घोडे , गणेश सावसाकडे, नयन पेंदोर व हर्ष येडे, पंकज वनस्कर, आर्यन लोंढे व प्रवीण लाक्सकर उपास्थित राहून सहकार्य केले.
