
सहसंपादक : रामभाऊ भोयर
डॉ श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास समिती किन्ही जवादे चे माध्यमातून कीन्ही जवादे गावातील शेतकरी व नागरिकांना शिलाई मशीन, स्प्रे पंप, तसेच लोखंडी डवरे व वखर ७५% अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. खरिप पुर्व हंगामात शेतीचे साहित्य मीळाल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले. गावातील युवती व युवकांना चार चाकी वाहन चालविणेचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असून त्यांना मालवाहू वाहने चालविणे चे लायसन्स मोफत मिळणार आहे.यावेळी सुधीर पाटील जवादे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, नरेश ठाकरे,राजु मोहुर्ले, किशोर गमे,पवन वाढई, मारुती विटाळे, दुर्गाबाई वडते, हरिदास सराटे, मारुती वाढई,पवन खैरकार, आत्माराम गानफाडे, गोवर्धन ढेकणे, महादेव काळे व अनेक शेतकरी उपस्थित होते
