
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यात खडकी येथे गुरुवार दि १२ जून रोजी दु १२ वा तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळावा घेऊन राजेंद्र झोटिंग यांच्या शेतात एच टी बी टी कापूस लागवड करून आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात माजी आमदार तथा शेतकरी संघटनेचे नेते अँड वामनराव चटप यांनी अध्यक्षीय भाषण केले. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललितदादा बहाळे यांनी तंत्रज्ञान बाजारपेठ व्यापार स्वातंत्र्य हा विषय हातळला. कृषी शास्त्रज्ञ डॉ. सी ही मायी योनी भारतातील जीएम तंत्रज्ञान विषयी वाटचाल सांगितली, आणि शेतकरी संघटना महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रज्ञाताई बापट यांनी प्रगत तंत्रज्ञान व शेतकरी महिला या विषयावर प्रकाश टाकला. तसेच मिलिंद दामले, शेतकरी तंत्रज्ञान आघाडी अध्यक्ष यांनी उशिरा येणाऱ्या माणसूनचे परिणाम यावर माहिती दिली. विजय निवल यांनी प्रास्ताविक केले. युवा आघाडी माजी अध्यक्ष यांनी संचालन केले. व एच टी बी टी कापूस लागवड याचे नेतृत्वात करण्यात आली, या आंदोलनात दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राळेगाव पोलीस निरीक्षक शितल मालटे, पीएसआय प्रशांत जाधव व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी शेतकरी संघटना यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र झोटिंग महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सोनाली मरगडे, देवराव पाटील धांडे, दशरथ पाटील, भास्कराव महाजन, खडकी येथील सरपंचा रंजनाताई नहाते, गजानन पारखी राजश्री झोटिंग, वर्षा गणेश मुटे, खुशाल हिरकर, सतीश देशमुख अकोला, चंद्रकांत मर्श, गजानन कोल्हे, विठ्ठल खोंडे, अमोल जवादे बंडू जी ढापरे, विक्रम फटिंग, जीवन इखार, हेमराजजी ईखार, देवेंद्र राऊत, दीपकअन्ना आंनदवार, चंद्रशेखर देशमुख, बालाजी पाटील काकडे, इदरचंद वैद, बंडूजी येरगुडे, किसनराव पावडे, बबनराव ठाकरे, दशरथ खैरे, हेमंत ठाकरे, गजानन ठाकरे, युवा आघाडी चे अक्षय महाजन, गोपाल भोयर, योच्या सह जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते युवा आघाडी कार्यकर्ते, महिला आघाडी सह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
केंद्र शासनाने यावर्षी एच टी बी टि व्या लागवडीसाठी राज्यांना ट्रायल परमिशन घेण्याच्या दृष्टीने पत्र मागितले होते, परंतु तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यात प्रामुख्याने कापूस होत, असताना सुद्धा यांनी कोणत्याही प्रकारचे नवीन तंत्रज्ञान घेण्याच्या दृष्टीने लागवडीस परवानगी दिली नाही. मागील 2008 साली जे तण प्रतिबंधित बियाणे भारतात शेतकऱ्यांना लागवडीसाठी मिळणार होते, ते बियाणे आजही शेतकऱ्यांना लागवडीसाठी मिळत नाही. याचा निषेध म्हणून व नवीन तंत्रज्ञान गुलाबी बोंड अळीला नियंत्रित करणारे क्रॉप वन वन ए आय हो तंत्रज्ञान भारत हैदराबाद स्थित श्रीराम बायोटेक या कंपनीने सुद्धा गुलाबी बोंड अळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने प्रयोग शाळा ट्रायल यशस्वी केल्या आहे. त्या ट्रायल भारतातील चार राज्यात घेण्याच्या दृष्टीने त्यांनी परवानगी मागितली होती, परंतु तेलंगणा, महाराष्ट्र गुजरात सरकारने कापूस उत्पादक भागात या ट्रायल नाकारल्या, याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले.
