क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची१३२ वी जयंती ढाणकी शहरात उत्साहात साजरी


प्रतिनिधी ::प्रवीण जोशी
यवतमाळ


ढाणकी शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून भव्यदिव्य शोभायात्रा निघाली व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या शांततेत व उत्साहात साजरी करण्यात आली.तत्पूर्वी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तदनंतर हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या अनुयायांनी ओसंडून वाहत असलेल्या जनसमुदाय जनसागर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर जनसमुदाय लिन झाला ज्यांनी जगभरातील करोडो लोकांच्या मनावर आपल्या विचाराने, कार्याने, कर्तुत्वाने, राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, राज्यघटनेचे, शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय जय काराच्या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला यावेळी लहान मुले हातात फलके घेऊन शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा उद्घोष असलेले फलक सुद्धा त्यांच्या हातात होती महिला मंडळी सुद्धा तितक्यात उत्साहाने या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या बाबासाहेब आंबेडकर यांनी अन्यायाला वाचा फोडून अनेकांना न्याय दिला त्या संघर्षाचे गीत गाऊन त्यांच्याप्रती महिला मंडळांनी सुद्धा आदर व्यक्त करताना बघायला मिळाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आणि त्यांनी अहोरात्र महेनत घेऊन भारताला संविधान दिले आणि हा देश संविधानावरच चालतो जर संविधान नसते तर अराजकता पसरली असती म्हणूनच आज देश सुरक्षित आहे. व देशाकडे वाईट नजरेने कोणाची बघण्याची सुद्धा हिम्मत नाही कारण भारत देश एक संघ आहे तो केवळ घटनाकार यांच्यामुळे ढाणकी शहरातील जुन्या बस स्थानक परिसरात निळ्या झेंड्यांनी संपूर्ण परिसर सजला होता देशातील अस्पृश्यता दूर करण्यासाठी आणि सर्व मानव जातीला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी शेवटपर्यंत लढा दिला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते आज त्यांची जयंती साजरी करीत असताना त्यांनी चालविलेल्या अन्याय आणि अत्याचाराविरुद्धचा लढा आपल्यालाही पुढे चालवायचा आहे आणि हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.