
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मला लवकर जेवण आण असे म्हणत पत्नीला शिवीगाळ केली, तसेच लोखंडी7 सुरीने पोटात वार करून पतीने तिला गंभीर जखमी केले.ही घटना तालुक्यातील विहिरगाव येथे बुधवार दि ११ डिसेंबर रोजी ११ च्या दरम्यान घडली.
सौ कौसल्या गजानन मेटकर (वय ४७) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
पत्नीच्या तक्रारीवरून गजानन रामा मेटकर (वय ५५) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन आणि कौसल्या हे पती-पत्नी आहेत.पत्नी कौसल्या ही सकाळी घरी स्वयंपाक बनवीत होती,तेव्हा आरोपी पती गजानन याने पत्नीला मला लवकर जेवण आण मले भूक लागली आहे,असे जोराने ओरडून सांगत होता.पत्नीने जेवण बनवायला वेळ लागते झाल्यावर आणून देते असे म्हटले.पतीने लवकर जेवण दे नाहीतर तुला मारून टाकतो अशी धमकी देत आरोपी पती हा लोखंडी सूरी घेऊन स्वयंपाक खोलीत गेला नंतर कौसल्या व गजानन यांच्यात स्वयंपाक बनविण्यावरून भांडण झाले. या कारणावरून गजानन याने पत्नी कौसल्या हिला शिवीगाळ केली.मी तुला मारून टाकणार, असे म्हणाला, तसेच हातातील लोखंडी सुरीने तिला ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला केला.यात तिच्या पोटात लोखंडी सुरीने वार केले.तेवढ्यात कौसल्या ची मुलगी लक्ष्मी ही आली व तिने आरोपीच्या हात पकडून आरडाओरड केली घराशेजारील लोकांनी धाव घेत आरोपीच्या ताब्यातून जखमी कौसल्या हिला बाजूला केले व गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार आपल्या पोलीस स्टॉपसह दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला व या घटनेतील आरोपी गजानन रामा मेटकर याला अटक करून त्याचेवर कलम १०९ भां.द.वी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक्त तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरकडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रशांत जाधव हे करीत आहे
