
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील खैरी येथे सामाजिक बांधकाम विभाग मार्फत खैरी चौरस्ता खैरी गाव ह्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम करीत असून ह्या रस्त्याचे काम सुरू आहे. सिमेंट रस्त्याचे बांधकाम करीत असताना रस्त्यावरील विद्युत खांब स्थानांतरित करणे अत्यंत आवश्यक आहे. ह्या विद्युत खांबामुळे रस्त्याने होणाऱ्या वाहतूक रहदारीस अडथळा निर्माण होऊ शकतो व त्यामुळे अपघातही होऊ शकतात. परंतु या गोष्टीकडे सामाजिक बांधकाम विभाग व वीज वितरण कंपनीकडून दुर्लक्ष केले जात आहे. तसेच रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याच्या बाजूने विद्युत खांब अजून पर्यंत स्थानांतरित केलेले नाही आहे. सध्या रस्त्याच्या एका बाजूचे काम सुरू असून दुसऱ्या बाजूचे काम सुरू करताना एका बाजूने झालेल्या सिमेंट रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली तर ह्या विद्युत खांबामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ह्या रस्त्यावरील विद्युत खांबामुळे कोणताही छोटा मोठा अपघात होऊ नये याची दखल घेऊन खैरी गावचे ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच श्रीकांत राऊत यांनी स्वतः माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ व कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यवतमाळ यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून व निवेदन देऊन हे रस्त्यावरील विद्युत खांब लवकरात लवकर रस्त्याच्या बाजूला स्थानांतरित करावे असे निवेदन दिले असून जर हे काम स्थलांतरित झाले नाही व त्या खांबामुळे रहदारी अडथळा निर्माण झाल्यास खैरी ग्रामपंचायत कडून कार्यकारी अभियंता विद्युत महामंडळ व सामाजिक बांधकाम विभाग यास जबाबदार धरण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे तसेच सरपंच यांनी सादर केलेल्या निवेदनाचा कार्यवाही केल्याचा अहवाल खैरी ग्रामपंचायतला सादर करावा असेही निवेदनात नमूद केले आहे तेव्हा कार्यकारी अभियंता सामाजिक बांधकाम विभाग यवतमाळ व अधीक्षक अभियंता सामाजिक बांधकाम विभाग हे या गंभीर बाबीची दखल घेऊन हे रस्त्याच्या कडेला असलेले विद्युत खांब केव्हा स्थानांतरित करतात याकडे खैरी ग्रामवशयाचे लक्ष लागले आहे.
