
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वडकी येथील शिवसेनेचे एकनिष्ठ आणि सक्रिय कार्यकर्ते तथा पालकमंत्री नामदार संजय राठोड यांचे अतिशय विश्वासू कार्यकर्ते यांच्याकडे पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या राळेगाव तालुका प्रभारी प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली असून आपण ती वरीष्ठाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून पक्ष वाढीसाठी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वाच्या माध्यमातून नवनिर्वाचित राळेगाव तालुका प्रभारी प्रमुख मनोज भोयर यांनी सांगितले असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच यवतमाळ जिल्हा पालकमंत्री नामदार संजय राठोड साहेब यांचे आभार मानले आहेत.
