
वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनटक्के साहेब यांची नुकतीच वणी येथे 8 दिवसापुर्वीच ठाणेदार म्हणून रूजू झाले. परिक्षेत्रात सूरू असलेली सट्टापट्टी, कलब, सुगंधित तंबाखू आणि मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू आनी अवैध दारू विक्री, हायप्रोफाईल जुगार अशा अवैध धंद्यांवर आवाहन ठाणेदारापुढे उभे आहे. आता ठाणेदार यांचे मुस्के आवळणार ? की परिस्थिती जैसे थेच राहणार ? असे एकना अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत असल्याने “काय राव या ठाणेदारावर भरोसा नाय काय ?” तत्कालीन ठाणेदारांनी काय केले,काय नाही केले,हे पाहण्यापेक्षा आता नवीन ठाणेदार काय कामगिरी दाखवतात,हे पाहणे महत्वाचे,असे धीरयुक्त अंदाज सल्ले नागरिक एकमेकांना देताना दिसूत येत आहे.
सध्याची परिस्थिती पाहता वणी परिक्षेत्राचा धावता विश्वानिय आढावा घेतला तर वणी येथील सीधी कालनी लगत दारू दुकाना समोर मागील बऱ्याचशा दिवसांपासून खुलेआम, बिनधास्तपणे सट्टापट्टी सुरू आहे. वणी शहारात बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात सट्टापट्टीच्या खेळ सुरू आहे. किराणा, कन्फेशनरी, पान मटेरिअलच्या दुकानात सुगंधित तंबाखूची विक्री होताना दिसत आहे. लाखोंचे हप्ते पोलीसांना देत आहो म्हणून हे धंदे सुरू आहे अशी माहिती चर्चाही शहराच्या नागरीकान कडुन होत आहे
नवीन ठाणेदारांना कदाचित यासंबंधीची माहिती नसावी ? तसेही अधिकाऱ्यांचा (काही अपवाद वगळता) मागेपुढे करणारी, लोटांगण घालणारी, चापलुसी करणारी ती टोळी फुकटचे सल्ले व मार्गदर्शन करण्यासाठी सक्रिय होताना दिसत असून, यात नवीन ठाणेदाराची भुमिका म्हत्वाची ठरणार आहे. असे असताना ते लवकरच वणी परिक्षेत्रातील सर्व अवैध व्यवसायिकांचे मुसके आवळून परिक्षेत्र अवैध धंदे मुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
