
सहसंपादक: रामभाऊ भोयर
एसटी बसला दुचाकीची धडक होऊन या अपघातात दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना दिं . ३ एप्रिल २०२५ रोजी ११:४५ च्या दरम्यान हिंगणघाट वडकी रोड वरील के जी एन दुकानाजवळ घडली.
याबाबतची तक्रार फिर्यादी स्वप्निल मोरेश्वर वैद्य व ३१ वर्षे यांनी पोलीस स्टेशनला दिली असून फिर्यादीचा भाऊ मोटर क्रमांक एम एच २९ सी ए ५३१३ ने जात असताना
राळेगाव एसटी महामंडळ आगाराची बस एम एच ४० एन ९६०३ या क्रमांकाची ही सकाळी राळेगाव वरून वडकी येथे आली होती दरम्यान वडकी वरून राळेगाव ला जातांना चालकाच्या निष्काळजीपने बस रॉग साइडला गेल्याने माझा भाऊ अक्षयचा अपघात झाला असून त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याची तक्रार पोलिस स्टेशनला दिली असून घटनास्थळाला वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांनी भेट दिली व जखमीला पुढील उपचारासाठी वडनेर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे हे करीत आहे.
