
प्रतिनिधी:: ढाणकी.
प्रवीण जोशी
ढाणकीत गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेला अनुसरून कार्तिक महिन्यात भक्तीयुक्त वातावरणात राम प्रहरी काकड आरतीचा आरंभ होतो ते सकाळी चार वाजता श्री हनुमंतरायाच्या मंदिरातून सुरुवात झालेल्या दिंडीने. आजूबाजूचा परिसर हा ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषाने रंगून गेला होता.
ढाणकीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी आश्विन पौर्णिमेपासून काकड आरतीला सुरुवात होऊन कार्तिक पौर्णिमेला काकड आरतीचा समारोप झाला त्यामुळे भक्तिमय वातावरण होते. सातत्याने महिनाभर सकाळपासून सगळीकडे विना, टाळ, मृदुंग, ढोलकीच्या, स्वरात युगपुरुष असलेल्या संतांचे विचार बिंबवल्या गेले “सेवा धर्मी पुण्य आहे सांगे सखा श्रीहरी देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी”अशा प्रकारचे भजने वारकरी बांधवांनी गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
आश्विन पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत संतांच्या विचारांचे स्मरण तेवत ठेवून अभंग, भजन, गवळण, गात सकाळी ठराविक विभागात काकड आरतीचा भक्तांचा जथा दिसत होता. यात प्रामुख्याने संतांचे विचार मांडले ते समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावे व चराचरात आनंदी भक्तीयुक्त वातावरण निर्मिती व्हावे चेतना मिळावी असा हेतू असतो. यावेळी तरुणासह बालक सुद्धा काकड आरतीला उपस्थित होते. शहरात महिला सकाळी लवकर उठून अंगणात सडा व रांगोळी काढून या दिंडीचे स्वागत ठीक ठिकाणी करताना आढळून आले. यावेळी भक्ती व श्रद्धेचा संगम दिसला हे बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
प्रथम अंगणातील असलेल्या तुळशी मातेजवळ गायीच्या दुधापासून बनलेल्या शुद्ध तुपात मुरलेल्या वातीपासून बनलेल्या काकडा प्रज्वलित करून तो काकडा तेवत ठेवून नंतर श्री हनुमंतरायाचे मंदिरा गाठेपर्यंत त्याची येतोचित पूजन केले जाते व पुन्हा आजूबाजूला ठिकठिकाणी संतांच्या वचनासह विविध भजने म्हणत ग्राम प्रदक्षिणा केली जाते.तेवत असलेला काकडा त्याच तुळशीमातेजवळ ठेवला जातो असे न चुकता अश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत वारकरी बांधवांनी केले.यावेळी दत्तात्रय दर्शनवाड याचेसह अनेक भक्तांचे सहकार्य लाभले.
