राळेगाव येथे तीन दिवसीय छत्रपती महोत्सव

सहसंपादक : रामभाऊ भोयर

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती वतीने तीन दिवसीय छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्य शिवरायांच्या रयतेचे राज्य विचारधारेची ओळख प्रबोधनाचा जागर व व विविध सामाजिक उपक्रम याप्रसंगी होत आहे .महोत्सवाचे स्वागताध्यक्ष राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ अशोक उईके हे असतील .याप्रसंगी शिव सामान्य ज्ञान स्पर्धा ,17 फेब्रुवारी रोजी छत्रपती महोत्सवाचे उद्घाटन, किल्ले स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा, शिवकालीन प्रसंगावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम ,तालुक्यातील शाळा महाविद्यालय सादर करतील, याप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड, विधान परिषद सदस्य भावनाताई गवळी ,खासदार संजय देशमुख, व स्वागताध्यक्ष आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येईल, दिनांक १८ फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर . छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ यांच्या जीवनपटावर आधारित महिलांची वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. तसेच सायंकाळी सात वाजता ऍड. निलेश सोनटक्के अमरावती यांचे “अष्टपैलू छत्रपती शिवाजी महाराज “या विषयावर जाहीर व्याख्यान होईल दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता भव्य बाईक रॅली १० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन व खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे वक्तृत्व स्पर्धेचा विषय” असा होता रयतेचा राजा’ हा असून सायंकाळी चार वाजता राळेगाव शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. सर्व स्पर्धे करता आकर्षक बक्षिसे देण्यात येत असून विद्यार्थ्यांनी व महिलांनी सर्व स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आयोजकाच्या वतीने कळविण्यात आले आहे