
मानकी येथे मध्य रात्री दरोडा, चोराला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात
वणी : नितेश ताजणे
वणी शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरफोडी,चोरीच्या घटना घडत आहेत, काही दिवसांपूर्वी मानकी येथे घरफोडी झाली होती. त्यावेळी अडीच लाखाचे सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी हात साफ केले होते. त्यानंतर सुद्धा अनेक वेळा रात्रीच्या वेळी गावात चोर आले होते मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेने चोरट्यांचा डाव असफल केले.
आज शुक्रवार ला मध्यरात्री अडीच वाजताचे सुमारास गावातील राजु वाढई यांच्या घरात एक चोर घुसला यावेळी राजुने घराचा दरवाजा बंद करून चोरट्याला पकडले. दरम्यान चोरट्याने राजुला मारण्याचा प्रयत्न केला असता राजुच्या मुलांनी व पत्नीने चोराला पकडून ठेवले. दरम्यान चोर पकडल्याची माहिती तंटामुक्त समितीचे अध्यक्ष परशुराम पोटे व पोलिस पाटील मिनाक्षी मिलमीले यांना दिली. तंटामुक्त समिती अध्यक्ष परशुराम पोटे यांनी घटनेची शहानिशा करून वणी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान या घटनेची माहिती गावात पसरताच गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
चोरटा हा युपी, बिहार सायडर असुन “मेरे घरके लोग दवाखाना मे है. मेरे पास पैसे नही”
असा तो बोलत होता.
दरम्यान मध्य रात्री ३:२० वाजता वणी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून गावकऱ्यांनी चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
ये गुड्डू के पप्पा का नंबर है
दरम्यान चोरट्याला पकडण्यात आले, त्यावेळी त्याचे जवळ मोबाइल फोन होता. त्या फोनवरून फोन केला असता ये नंबर गुड्डू के पप्पा का है! हम चंद्रपूर मे है. उसे मारो मत , पुलीस के हवाले करो असे त्या चोरट्याच्या पत्नीने सांगितले.
मात्र चोरट्याला चंद्रपूर बाबत विचारले असता, चंद्रपूर कुणीकडे आहे हे त्याला माहीत नसल्याचे तो सांगत होता.
दरम्यान पकडण्यात आलेल्या चोरट्यांकडून वणी शहरासह परिसरातील झालेल्या घरफोडीचे, चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
