
प्रतिनिधी: प्रवीण जोशी ,ढाणकी
अपघात झाल्यानंतर लगेच रक्त लागते किंवा कोणत्याही प्रकारे दूरधर आजाराने ग्रस्त असल्यास रक्ताचे अनन्य साधारण महत्त्व असते म्हणूनच रक्तदान श्रेष्ठदान हे ब्रीदवाक्य प्रचलित आहे याला अनुसरून ढाणकी पासून जवळच असलेल्या अकोली येथे रक्तदानाचा कार्यक्रम दिनांक 1 तारखेला पार पडला ग्रामीण भागात सुद्धा रक्तदान होत असल्यामुळे नक्कीच रक्तदानाचे महत्त्व काय असते हे सर्व सामान्य पर्यंत पोहोचत आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ साधनाताई पवार होत्या तर बिटरगाव चे कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रताप भोस हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला लाभले होते यावेळी एकूण 50 जणांनी रक्तदानाच्या शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदविला होता यावेळी गावातील अनेक मान्यवर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते त्यामध्ये डॉ मुद्दलवार, सुदर्शन पाटील, देविदास जामकर, संदीप धात्रक, माधवराव पाटील, सुभाष चिन्नावार, आनंदराव भोयर, सुनील भुसारे, बाळू मोटाळे, सुनील पाटील, बाळू पवार, सतीश पवार, गौरव हनवते, चंपत वाघमारे, प्रकाश वाघमारे, पिंटू राठोड, बालाजी जाधव, सचिन कांबळे, सूरज हनवते, संदेश लावरे, इत्यादी गावातील नागरिक उपस्थित होते यावेळी नांदेड येथील शासकीय दवाखान्याचे डॉक्टर उपस्थित होते. शरद अवचार, एस डी नागरगोजे, निवघे, कोकाडे, वालाप्रसाद भालेराव, अजय सर, शामराव जोंधळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते
