
चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या.त्यावर काही प्रमाणात अंकुश लावण्यात पोलिसांना यश येत असल्याचे दिसून आले.एक संशयास्पद इसम वरोरा बस स्थानक परिसरात विना कागदपत्रांची दुचाकी विकण्यासाठी गिऱ्हाईक शोधत होता.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विचारपूस केली, त्याच्या ताब्यात असलेली दुचाकी वाहन हिरो होंडा क्रमांक mh40u7839 बाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली.
कसून चौकशी केल्यावर त्याने ती दुचाकी वर्षभराआधी चिमूर तालुक्यातुन चोरल्याची कबुली दिली.आरोपीचे नाव 26 वर्षीय अमर उर्फ पिंटू पुरुषोत्तम मेश्राम असून तो वरोरा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. आरोपीने इतर काही गुन्हे केले आहे का याबाबत कसून चौकशी केली असता आरोपीने चिमूर, सिंदेवाही, भद्रावती, बेला, हिंगणघाट, कुही, नंदोरी, वणी, बुटीबोरी व इतर ठिकाणाहून दुचाकी वाहने चोरी केली असल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपी मेश्राम कडून MH-34-AZ-8607, MH-34-AN-1012, MH-34-AD-0565, MH-49-S-6528, MH-32-V-7497, MH-40-AF-5917, MH-32-AB-6631, बनावटी क्रमांक MH-32-AM-9247, MH-29-Z-5907, MH-36-P-2409, MH-40-Z-6320, MH-29-AE-605, MH-33-U-2904, बनावटी MH-34-X-2536, MH-40-C-6427 अश्या एकूण 14 दुचाकी सहित 4 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी, प्रभारी पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि संदीप कापडे, पोउपनी अतुल कावळे, पोलीस कर्मचारी प्रकाश बलकी, नितीन साळवे, सुभाष गोहोकार, सतीश बगमारे, मिलिंद जांभुळे, प्रमोद डंभारे यांनी केली.
पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.
