
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मा.अशोक मेश्राम यांनी अनेक विषयावर भाष्य केले,ते म्हणाले भारतीय जनता पार्टी रोज रोज भारत ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनतोय चे तुणतुणे वाजवीत असते पण प्रत्यक्षात जमीनवर काय आहे हे तरी त्यांना कळते काय ? जर भारताची अर्थव्यवस्था एवढी सुदृढ झाली आहे तर आजही शेतकरी का आत्महत्या करत आहे ?ते आपल्या कर्जाची परतफेड का करु शकत नाही ?बीज बील का भरु शकत नाही,का त्यांना वारंवार दिल्ली च्या बोट क्लब वर आंदोलन करावे लागते ?अशा अनेक प्रश्नाला त्यांनी वाचा फोडण्याचे ठरविले.आज शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अजून पंचनामे झाले नाही,जगाचा पोशिंदा आज वैफल्यग्रस्त अवस्थेत आहे व सरकार सवंग लोकप्रियता मिळवून पुन्हा सरकार कसे स्थापन करता येईल त्यात मग्न आहे ही खेदाची बाब आहे.गावागावातुन फिरत असतांना असे जाणवते की तरुणांच्या हाताला काम नाही, पानटपरी वर बसून व्यसनाधीन होत आहे,खाली दिमाग शैतान का घर,हे तरुण च आता सरकार उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही असा संदेश अशोक मेश्राम यांनी दिला,ते 77 , राळेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे असे त्यांनी अगोदरच जाहीर केले आहे व ते त्यादिशेने शेतकरी, महिला, तरुण यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अहोरात्र मतदार संघ पिंजून काढत आहे.
नुकताच एक आँनलाईन सर्वे सोशल मीडियावर फिरत आहे त्यात पहिल्या क्रमांकाची मते घेऊन अशोक मेश्राम आघाडीवर आहे त्यातून हेच लक्षात येते की जनतेला नवीन चेहरा हवा आहे,बदल हवा आहे,त्याच त्या जुन्या चेहर्यांना कंटाळली आणि त्यांनी निर्णय घेतला की जनतेचा उमेदवार अशोक मारुती मेश्राम आहे.शेवटी ते म्हणाले जनता जब जागती है,सरकार को सिंहासन खाली करना पडता है.