
ढाणकी प्रतिनिधी:प्रवीण जोशी
दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान गोपनीय माहितीनुसार बिटरगाव पोलीस ठाणेदार प्रताप बोस यांनी तीन युवकांना शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे
बिटरगाव पोलीस यांना गोपनीय माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक कपिल मस्के यांच्या फिर्यादीवरून ढाणकी येथील राज वाईन बार फुलसांगी फाटा परिसरात काही युवकाकडे सशस्त्र असल्याची माहिती मिळताच बिटरगाव पोलीस स्टेशन चा ताफा फुलसांगी फाटा परिसरात गेले असता मुख्य आरोपी राजरत्न बापूराव इंगोले वय वर्षे 24 याच्याकडे चाकू असल्याची माहिती मिळताच त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळून चाकू जप्त केला असून त्याच्यासह संतोष गणेश रणखांबे वय वर्ष 21 रा तळणी, शुभम किसन डेहाने वय वर्ष 21 यांना ताब्यात घेतले असून त्यांचा सहकारी सिद्धार्थ प्रभू काळबांडे वय वर्ष 28 रा. सावळेश्वर हा फरार झाला पोलिसांच्या प्राप्त माहिती नुसार सिद्धार्थ व राजरत्न या दोघांवर वर यापूर्वी पण आर्म ऍक्ट नुसार गुन्हे दाखल झालेले आहेत
याप्रकरणी दोन कोयते, एक चाकू, चार चाकी वाहन , दोन मोटरसायकल, मोबाईल सह अंदाजे सहा लाख 61 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पुढील तपास बिटरगाव पोलीस ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कपिल मस्के, बीड जमदार मोहन चाटे, देविदास हाके, सतीश चव्हाण व निलेश भालेराव पुढील तपास करत आहे
