
सहसंपादक: रामभाऊ भोयर
जीवना बद्दल नेहमीच म्हटले जाते की, जिद्द है तो जित है ……
राळेगाव शहरातील न्यू इंग्लिश हायस्कूल चे वर्ग 10 वी चे दोन माजी प्रतिभावान विद्यार्थी कु. स्नेहा शिवरकर व प्रतीक घोसे, त्यामधील विद्यार्थिनी कु स्नेहा शिवरकर हिने आपल्या घरच्या अत्यंत प्रतिकूल गरीब परिस्थितवर मात करून कठोर मेहनत करून तीने केवळ ऑनलाईन नीट चे कलाससेस करून यवतमाळ च्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम. बी बी. एस ला प्रवेश मिळाल्यामुळे ती आता डॉक्टर बनणार .तर आई व .वडिलांच्या मार्गदर्शनामुळे प्रतीक घोसे हा विद्यार्थी सुद्धा केवळ ऑनलाईन नीट कलाससेस करून गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम. बी. बी. एस करणार आहे….या दोन्ही शाळेतील माजी प्रतिभावान विद्यार्थ्यांनी न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये आपल्याला वर्ग 10 वी मध्ये सर्व शिक्षकांनी कसे अनमोल मार्गदर्शन केले आहे हे आपल्या मनोगतात व्यक्त केले. तर या दोन्ही प्रतिभावान विद्यार्थ्यांचा सत्कार न्यू एज्युकेशन सोसायटी, राळेगाव चे अध्यक्ष बी. के. धर्मे व सचिव डॉ. अर्चना धर्मे यांनी केला. या कार्यक्रमास मुख्याध्यापक जितेंद्र जवादे, उपमुख्याध्यापक विजय कचरे, पर्यवेक्षक सुरेश कोवे यांच्या सह शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
