
राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर
सोळाव्या शतकातील गोंडवाना गडमंडला साम्राज्याची कर्तुत्ववान व पराक्रमी राणी वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांनी तीरकमठा तलवारबाजी घोडेस्वारी, नेमबाजी, गोळाफेक, भालाफेक, तसेच शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले होते. त्याच बरोबर त्यांनी संस्कृतशास्त्र, समाजशास्त्र,धर्मशास्त्र,इत्यादी विषयांवर अभ्यास केला होता. अश्या या पराक्रमी राणीच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून त्यांची ४९९ वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी. आदिवासी समाजाचे कर्तव्यदक्ष समाजसेवक नानाजी कोवे, रा. वालधूर, भाऊरावजी, गेडाम, माजी सदस्य ग्रामपंचायत राळेगांव, रामचंद्र मेश्राम, अंकुश कुमरे, संगीत मेश्राम, अनुराग मरसकोल्हे, किशोर उमरतकर, पुरूषोत्तम शेराम, रामभाऊ मेश्राम, गजानन तुमराम, रणजित परचाके, विक्रम कुमरे, अंकित मोकासे, उपस्थित होते.
