
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
उन्हाळा आता आपले रौद्र रूप दाखवत आहे. त्यामुळे तापमानात उलथापालथ होत असताना साप खुल्या मैदानाला कुठे पण आढळतात. नाग धामण या व्यापक सापांचा प्रणय क्रीडेचा काळ सुरू असल्याने सर्प चावा घेण्याचे संकेत मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सजग राहून काम करण्याची गरज आहे असे आवाहन ज्येष्ठ सर्पमित्र संजय अनंतराव भोसले यांनी केले.
साप निसर्गातील महत्त्वाचा घटक मानल्या जातो. साप सरपटणारा प्राणी आहे हे सर्वश्रुत जाणतात. उष्णतेची दाहकता जाणवत असताना भूतलावरील उष्णतेत फेरबदल होत असून थंड्याला व सावज शिकारीसाठी हा सरपटणारा प्राणी मोकळ्या मैदानात दिसतात.
सध्या सापाचा प्रणय क्रीडेचा मिलनाचा मोसम असल्यामुळे एक किंवा त्यापेक्षा अधिक जास्त साप नागरिकांच्या नजरेला दिसू शकतात. उन्हाळ्याच्या ऋतूत सरपटणाऱ्या सापांची चपळता चंचलता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे साप तावखोर स्थितीत आढळतात. त्यामुळे चावा घेण्याचे संकेत अधिक प्रमाणात असते.आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या व काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी मजुरांनी कष्टाचे काम करीत असताना पायाची सुरक्षितता राहील असे पादत्राणे घालने आवश्यक आहे. माळ रानात दिसणारे व सरपटणारे साप विषारी असतात केवळ फूरसे, घोणस, नाग, मन्यार पोवळा हे साप मोठ्या प्रमाणात विषारी असतात. सापाने चावा घेतल्यास त्याला प्रथम उपचारासाठी तत्काळ शासकीय इस्पितळात दाखल करण्याची आवश्यकता असते. जिथे कुठे साप नजरेला पडला असेल त्या क्षणी नागरिकांनी त्यापासून दूर राहून साप आढळल्यास वनविभाग किंवा सर्प मित्रांशी संपर्क करण्याची निकड असल्याच निसर्ग वन्यजीव व सर्पमित्र संजय भोसले यांनी सांगितले.
सापाचे विष उन्हाच्या दाहकतेमुळे अधिकच पातळ होते व सापाने चावा घेतल्याने वेगाने अंगभर प्रसरण पावते यामुळे नागरिकांनी सापांपासून सजग दूर राहून जिथे कुठे सापाने चावा घेतल्याची घटना घडल्यास नागरिकांनी वेळ वाया न घालवता तत्काळ नजीक असलेल्या शासकीय इस्पितळात दाखल व्हावे.
डॉ. विजय कवडे
