सावधान… पावसाळा लागलाय साप बिळातून बाहेर येणार,विषारी सापांच्या फक्तं ४ मुख्य जाती “

सहसंपादक : रामभाऊ भोयर


पावसाळा सुरु झाला त्यामुळे सापांच्या बिळात पाणी शिरल्याने ते आपल्या साठी वातावरणा नुसार पोषक स्थळी आश्रय घेतात.मग ते शेत शिवार असो की कुणाचे घर, किंवा जाणवरांचा गोठा अश्या ठिकाणी साप आश्रय घेतात साप विषारी असो किंवा बिनविषारी तो दिसताच नागरिक भयभीत होतात व त्याला ठार मारतात.
जिल्ह्यात ‘विषारी’ विषारी सापाच्या मुख्य ४ जाती आहे. त्यात मन्यार,नाग,घोनस,फुरसे तर ‘निमविषारी’ सापाच्या मांजऱ्या, हरणतोळ, भारतीय अंडेखाऊ व जाडरेती साप या जाती आहे. तसेच ‘बिनविषारी’ जाती मध्ये भारतीय अजगर,धामण, तस्कर,नानेटी,दुरक्या घोनस,कुकरी,धुरनागिन,कवड्या,दिवट, रुका,गवत्या,माडुळ या जातींचा समावेश होतो.
सापांच्या मिलनाचा काळ मार्च-एप्रिल हे दोन महिने असतो, मे महिन्यात साप अंडी घालतो. सापांची अंडी उबवण्यासाठी ३० डिग्री अंश सेल्सीयस पेक्षा कमी तापमाणची गरज असते. असे तापमान असलेल्या ठिकाणी साप अंडी देतो.यात ५० ते ६० दिवसात म्हणजेच जुन-जुलै या महिन्यात पिल्ले निघायचा काळ असतो या पावसाळी महिन्यात सर्वत्र हिरवळ असते. त्या मुळे या काळात बहुतांशी साप निघतात.निसर्गाचा समतोल व जीवन चक्र राखण्यासाठी साप वाचवीने गरजेचे आहे.

साप आढळून आल्यास…

साप दिसल्यास स्वतः पकडण्याचे धाडस करू नये, सापावर लक्ष ठेऊन सर्पमित्राशी किंवा वानविभाग १९२६ या क्र.ला संपर्क करणे.
• घरात साप आढळून आल्यास त्याच्या पासून ५ ते ६ फुट अंतर ठेऊन उभे राहावे.
• शेतात तसेच रस्त्यावर साप आढळून आल्यास इजा न पोहचविता त्यास जाऊ द्यावे.

सर्पदंश झाल्यास…..
• सर्पदंश झाल्यास जखम स्वच्छ पाण्याने धुवावी.
• वेळ न गमवता त्या व्यक्तीस दवाखान्यात न्यावे.
• जखमेच्या अंगाची जास्त हालचाल करू नये.
• विष हे तंत्र-मंत्राने उतरत नाही त्यामुळे कुण्या मंदिरात नेऊ नये.

:• साप खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा मित्र आहे. निसर्गाची अन्नसाखळी कायम राखण्यासाठी सापांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात उपचार घेणे आवश्यक आहे .
संदीप लोहकरे सर्पमित्र / प्रणिमित्र

पावसाळ्यात दरवर्षी सर्पदंशात अनेक लोकांचा मृत्यू होतो. पावसाळा सुरु झाल्या पासून जवळपास हिवाळा संपेपर्यंत काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्पदंशाबाबत शेतकरी तसेच ग्रामीण भागात व्यापक जनजागृतीची गरज आहे.
– अभिजित ससनकर सर्पमित्र/प्रणिमित्र