मौजे सारखनी येथील रास्त भाव (कंट्रोल) दुकानाच्या चौकशी चे काय झाले?


प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे
2021 मधील सप्टेंबर महिन्याचे राशन शेट च्या घश्यात?

2021 मधील सप्टेंबर महिन्या मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत पूर्णतः अनुदान स्वरूपात रास्त राशन धारकान करिता आलेले धान्य मौजे सारखनी येथील रास्तभाव (कंट्रोल) दुकानास सप्टेंबर 2021 ला उपलब्ध करून देण्यात आले होते पण
EPOS मशीन ला सदरील सप्टेंबर महिन्याचे धान्य वाटप करण्यासाठी शासनाकडून अक्टोंबर महिन्यात डाटा उपलब्ध करून देण्यात आला होता
रास्तभाव दुकान धारक यांच्या कडून अक्टोंबर महिन्यात सदरील धान्य वाटप केले नसल्याने गावातील नागरिक यांनी तहसील कार्यालय किनवट आणि जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड येथे तक्रारी केल्या असता वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून सदरील घटनेची दखल घेतली होती पण सदरील घटनेवर कार्यवाही केली नाही असे दिसून येते आले