
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दि.२४/०५/२०२५ रोजी
महाराष्ट्र राज्य पाटबंधारे विभागाचे सचिव डॉ.संजय बेलसरे यांची बेंबळा कालवे शेतकरी संघर्ष समिती व पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष सुधीर पाटील जवादे यांनी भेट घेतली. पाटबंधारे विभागाने हाॅटेल ओबेरॉय येथे आयोजित मिटींग करिता सचिव डॉ संजय बेलसरे आले असता , त्यांनी बेंबळा प्रकल्पाच्या माध्यमातून विकास कामे करताना येणाऱ्या अडचणी माहिती करून घेण्यासाठी संबंधित इंजिनिअर,एनजीओ,व पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी म्हणून सुधीर पाटील जवादे यांचेशी चर्चा केली.यावेळी कार्यकारी अभियंता श्री ग.ल.राठोड , कार्यकारी अभियंता सुरज राठोड कंत्राटदार सुमित बाजोरिया,व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
