
राळेगाव (दि. ६ मार्च २०२३): संस्कृती संवर्धन विद्यालय राळेगाव शाळेतील विद्यार्थ्यांना होळी सणाचे महत्त्व सांगून होळीसाठी वृक्षतोड थांबवणे, आणि पर्यावरणाचे रक्षण करणे ही नैसर्गिक संतुलनाकरिता आत्यंतिक गरजेची बाब बनलेली आहे. तसेच ती आपण सर्व मानवांची जबाबदारी देखील आहे, असा संदेश देत शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी येसेकर यांनी शाळेत असलेल्या वृक्षांचे पूजन केले. विद्यार्थ्यांनी त्यांचे घराजवळील कचरा, घराची स्वच्छता करताना निघालेल्या कच-यांची होळी करावी, परंतु होळीसाठी वृक्ष तोड करु नये. त्याचप्रमाणे रंगपंमीला केमिकल नसलेले कोरडे रंग, गुलाल अथवा पळस फुलांचा नैसर्गिक रंग करा. तो वापरुन रंगपंमी साजरी करा असे आवाहन केले. आणि पर्यावरण रक्षणासंबंधी शास्त्रोक्त माहिती दिली.कु जान्हवी काटकर, साहील झाडे, आदी विद्यार्थ्यांनी वृक्षांना दररोज पाणी घातले जाईल, असे सांगून वृक्षांचे पूजन केले. याप्रसंगी राकेश नक्षिणे, योगेश मिटकर, ज्ञानेश्वरी आत्राम, भाग्यश्री काळे ,सलमा कुरैशी, विलास ठाकरे, अनंता परचाके,, प्रकाश अंबादे तसेच शाळेतील मुले उपस्थित होती.

