भाजपाचे माजी जि.प.सदस्य मा.राहुलभाऊ संतोषवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत चक हत्तीबोडी येथील सरपंच सहित पाच सदस्याचा भाजप मध्ये पक्षप्रवेश

..

मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार, वने, मत्स्यव्यवसाय, व सांस्कृतिक मंत्री म.रा.यांच्या विकासाच्या झंजावतामुळे ग्रामपंचायत चक हत्तीबोडी येथील शिवसेनेच्या सरपंच सहित पाच सदस्याचा भाजपामध्ये पक्षप्रवेश….

पोंभूर्णा तालूका प्रतीनीधी:- आशिष नैताम

पोंभूर्णा:- मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार, वने, मत्स्यव्यवसाय, सांस्कृतिक मंत्री म.रा.यांच्या विकासाच्या झंजावतामुळे ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य मा.राहुल संतोषवार यांच्या नेतृत्वाखाली (15 जानेवारी) ग्रामपंचायत चक हत्तीबोडी येथील शिवसेनेच्या सरपंच सहित ५ सदस्यानी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला.यामध्ये सरपंच सौ.संगीता मनोज कुळमेथे ग्रा.पं.सदस्य धनराज सातपुते, कांताबाई बुरांडे, निशा गदेकर,मारोती गेडाम, उमाजी उंदिरवाडे या सर्वांनी मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार, वने, मत्स्यव्यवसाय, व सांस्कृतिक कार्यमंत्री म. रा.यांच्या विकासकामांवर विश्वास ठेऊन पक्षात प्रवेश केला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मागील दोन वर्षात शिवसेनेच्या हातात चक हत्तीबोडी ग्रामपंचायत वर शिवसेनेची सत्ता होती तेव्हापासून गाव विकासापासून वंचित राहिलेला होता. तेथील पाणीपुरवठा योजनेची जठील बनलेली समस्या शिवसेना सोडवू शकलेली नसल्याने तेथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावरून शिवशेनेची विकासाची पोलखोल दिसून येते आहे. मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार, वने, मत्स्यव्यवसाय, व सांस्कृतिक मंत्री (म.रा.) हे मागील सरकारच्याकाळात अर्थमंत्री असतांना गावाचा सर्वांगीण विकास केलेला आहे.महाविकास आघाळी सरकारच्या काळात विकास फक्त नावापुरताच राहिलेला होता.आजचा पक्षप्रवेश भाजपा ला अधिक ताकद दिल्याशिवाय राहणार नाही.आजचा पक्षप्रवेश हा पक्षाला अधिक पाठबळ ताकद दिल्याशिवाय राहणार नाही,असा विश्वास यावेळी भाजपाचे मा.राहुल संतोषवार यांनी व्यक्त केला.यावेळी उपस्थित नगर पंचायत पोंभुरणा चे उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार, माजी उपसभापती ज्योती बुरांडे,नगरसेवक दर्शन गोरंटीवार,,पोंभुरणा शहर भाजपा अध्यक्ष ऋषीजी कोटरंगे,ग्रा.पं. सदस्य तथा माजी सरपंच चेक आष्टा जयंत पिंपळशेंडे यावेळी उपस्थित होते.