
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आदिवासी जननायक, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त #जनजातीयगौरवदिवस निमित्त राळेगाव येथे बिरसा मुंडा उत्सव समितीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन बिरसा मुंडा उत्सव समिती अध्यक्ष श्री. सुधाकरजी गेडाम व समिती सचिव श्री. संदीप पेंदोर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये विशेषतः कार्याध्यक्ष व माजी नगराध्यक्ष श्री. बबनराव भंगारे, घनश्याम चांदे मामा, श्री. भूपेंद्रजी कारिया, गणेश भाऊ देशमुख, सुरेंद्र गुंदे, अॅड. प्रितेश वर्मा (शहराध्यक्ष भाजप), शुभम मुके (जिल्हा सरचिटणीस भाजप), अनिल भाऊ राजूरकर (समाचार संपादक), फिरोज भाई लाखानी, अभिजीत भाऊ कदम, आशिष भाऊ इंगोले, नारायण पेंदोर, सीमाताई एडसकर, गेडाम ताई, मेश्राम ताई, छायाताई पिंपरी (तालुका अध्यक्ष भाजप), भोयर काकू, चिंपू हिकरे, अरविंद केराम, रणधीर किनाके, अज्जू भाई शेख, बादशाह काजी, प्रदीप भोयर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या आदर्शमय कार्याची स्मृती जागृक ठेवत समाजात एकता, जागृती आणि प्रेरणा पसरविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या क्रांतिकारी योगदानाची आठवण करून देत आगामी पिढीला त्यांच्या कार्यातून बळ मिळावे, अशी भावना व्यक्त केली.
