रोटावेटर घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला, १ठार १गंभीर जखमी मारेगाव तालुक्यातील वेगाव शिवारातील घटना

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

मार्डी येथून एका शेतामध्ये काम करून रोटावेटर घेवून गावाकडे जाणारा ट्रॅक्टर कोलगाव वेगावच्या मधामध्ये असलेल्या पुलावरून जात असताना वाहन चालकांचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सोडल्याने एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची दुदैवी घटना २३नोव्हेंबर रोज मंगळवार रोजी रात्रीच्या १० वाजताच्या सुमारास घडली.
शेतीकामासाठी एका मजुराला गावाकडे ट्रँक्टरवर घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाल्याचं वृत्त आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात १ जण जागीच ठार झाले तर १ जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोलगाव वेगावच्या रस्त्याच्या मधामध्ये असलेल्या पुलावरुन जात असताना चालकाचं ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने रोटावेटर सहित ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला असलेल्या कँनलच्या नाल्यात कोसळला. यात मारोती वालकोंडावार वय वर्षे (२४)हा जागीच ठार झाला तर भारत बोथाडकर (२८ ) (चालक )हा गंभीर जखमी झाला असुन जखमींना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. असुन पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी पाठविण्याची तयारी सुरू होती. या घटनेने वेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.