
एस. टी. कर्मचारी मानले श्रमिक एल्गार चे आभार
एस. कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र शासनात विलागिकरण करण्यासाठी मागील 106 दिवसापासून जिल्ह्यात आंदोलन सुरू असून महाराष्ट्र शासनाने आंदोलनकर्त्यांना अजूनही दाद दिली नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून अनेक कर्मचारी शहीद झाले. शासनाने एस. टी. कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू न केल्याने कर्मचाऱ्यांना कुटुंब जगविणे कठीण होत आहे या जाचाला कंटाळून अनेक कर्मचारी शहीद झाल्याने दुखवटा आंदोलन सुरू करण्यात आला. याची दखल श्रमिक एल्गार संघटनेने घेत गरजू कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडवून दिले. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ॲड. फरहात बेग, श्रमिक एल्गार चे अध्यक्ष प्रवीण चिचघरे, उपाध्यक्ष घनशाम मेश्राम, ॲड. कल्याण कुमार यांनी मार्गदर्शन केले. करून किट वाटप केली व शुभेछ्या दिल्या यावेळी सर्व कर्मचारी आभार मानले.
