
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगांव महसूल विभागाअंतर्गत येत असलेल्या वाढोणा बाजार हलक्याचे तलाठी फिर्यादी मिलिंद नामदेव लोहोट यांच्यासोबत रेती तस्करांनी वाद घालून यांच्यावर रेती वाहतूक चालू का देत नाही वादातून जीवघेणा हल्ला झाला आहे.
वाढोणा बाजार चे तलाठी मिलिंद लोहोट हे आपले शासकीय कामकाज आटोपून कार्यालयात आराम करीत असताना येथीलच आरोपी प्रतीक वाढोणकर व यांच्यासोबत असलेल्या आणखी दोघांनी संगणमत करून शासकीय कार्यालयात घुसून फिर्यादी तलाठी लोहोट यास तू आमच्या रेतीच्या गाड्या का चालू देत नाही या कारणावरून अश्लीश भाषेत शिवीगाळ करून आरोपीने फिर्यादिस पकडून त्यांच्या डोक्यावर व हातपायावर लोखंडी रॉड ने रात्री १०:३० वाजता च्या दरम्यान जीवघेणा हल्ला केला असून यात गंभीर जखमी केले असून जिवाने मारण्याची धमकी दिली आहे.व आरोपी घटना स्थळावरून पळून गेले . त्यानंतर तलाठी लोहोट याला जखमी अवस्थे मध्ये असतांना गावातील लोकांनी तलाठी यांना राळेगाव येथील रुग्णालयामध्ये नेले व नंतर सेवाग्राम येथे भरती करण्यात आले आहे. वाढोणा बाजार येथे प्रतीक वाढोणकर सह इतरांचे अवैध वाळू चे व्यवसाय आहे.हा तलाठी अवैध वाळू वाहतुकीवर निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न शील होता अशातच दबंग तलाठी घाट पिंजून काढत होता यातच या परिसरामध्ये वाळू माफिया वर कारवाई करून वाळू वाहतुकीवर आळा बसला होता व्यवसाय बंद झाल्यामुळे वाढोणा बाजार येथील वाळू माफिया प्रतीक वाढोणकर सह इतरांनी हल्ला केला असून आरोपी वर प्रतीक वाढोनकर व दोन इसमा विरुद्ध कलम १३२,१२१(२)२९६,३५१,(२) ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला पुढील तपास सुरू आहे.
