पोलीस स्टेशन वडकी हे आयएसओ दर्जा प्राप्त असल्याने कामकाज सुटसुटीत व गतिमान व्हावे:पोलीस अधीक्षक पवन बनसोड यवतमाळ

सहसंपादक: रामभाऊ भोयर


राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन हे आय. एस. ओ. दर्जा प्राप्त असल्याने पोलीस स्टेशन वडकीतील कामकाज सुटसुटीत व गती मान व्हावे.
व परिसर स्वच्छ रहावे. याकरिता पोलीस मॅन्युअल भाग दोन नुसार मागील 35 ते 40 वर्षापूर्वीचे पोलीस स्टेशन वडकी येथे असलेले कागदपत्रे छाननी करून त्यापैकी जतन करण्यासाठी विहित कालावधीतील महत्त्वाचे व आवश्यक असलेले कागदपत्रे वेगळे काढून सुरक्षित ठेवले असून उर्वरित काल मर्यादा संपलेले व उपयोगात नसलेले कागदपत्रे ब परिशिष्ट प्रमाणे कागदपत्रे वेगळे काढून नष्ट करणे करिता ठेवण्यात आले असून वरिष्ठांच्या आदेशानुसार नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही मा. पवन बन्सोड साहेब, पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे आदेशाने पोलीस स्टेशन वडकी येथील ठाणेदार विजय महाले यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अधिकारी, अंमलदार, होमगार्ड यांनी केली.आहे.