
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
दिवाळी तीन दिवसावर येऊन ठेपल्याने शेतकऱ्याजवळ दिवाळी साजरी करण्यासाठी जे पैसे लागतात ते नसल्याने दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहेत यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ही निश्चितच अंधारात जाणार आहे।।।। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासनाने अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना द्यावयास हवी होती ही मदत कधीचीच जिल्हा तसेच तालुका स्तरावरील प्रशासनाकडे आल्याची माहिती आहे पण कशाच्या आधारावर द्यायचे याचे निकषच पक्के नसल्याने तसेच याद्या तयार नसल्याने ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही ही मदत जरी जमा झाली असती तरी निश्चितच शेतकऱ्यांची काही प्रमाणात का होईना आर्थिक अडचण दूर झाली असती पण शासन प्रशासनाने याबाबत कुठलीही ठोस पावले न उचलल्याने शासन शेतकऱ्यांच्या दारी वेळेवर पोहोचले नाही परिणामी ही मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळाली नाही दुसरीकडे पिकविमा कंपनीने सुद्धा शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसलेले आहेत शहरासह तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले विमा कंपनीने ते मान्य केले आहेत विमा कंपनीच्या प्रतिनिधीने नुकसानाची पाहणी करून नुकसान भरपाई देतो असे म्हटले पण आजतागायत एक रुपया सुद्धा विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला नाही जर विमा कंपनीने ही मदत वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली असती तर निश्चितच दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना त्याची मदत झाली असती पण विमा कंपनीने एक रुपया सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले नाहीत सोबतच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून प्रोत्साहन पर अनुदान म्हणून 50 हजार रुपये देण्यात येत आहेत पण या यादीतील अनेक शेतकऱ्यांना विविध कारणाद्वारे आधीच अपात्र घोषित केले आहेत आणि जे शेतकरी राहिले त्या शेतकऱ्यांना तरी दिवाळीपूर्वी 50 हजाराची मदत मिळावयास हवी होती पण मायबाप सरकारने ही मदत सुद्धा दिवाळीपूर्वी त्या शेतकऱ्यांना दिली नाही दुसरीकडे केंद्र शासनाच्या शेतकरी सन्मान योजना तसेच राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजना या योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात या योजनेतील लाभार्थी सुद्धा शासनाने विविध कारण सांगून मोठ्या प्रमाणात कमी केले अन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहेत अशा प्रकारच्या नोटीस पाठवल्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना या नोटीस मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढल्या आहेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एखादी भेट तर सोडाच पण शेतकऱ्यांना हक्काचे सुद्धा त्यांचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत किंवा ते देण्यासाठी शासन प्रशासनाने प्रयत्न केले नाहीत म्हणजेच एक प्रकारे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात घालण्यामध्ये शासन प्रशासनाचा मोठा हात असल्याचे यावरून दिसून येते दिवाळीपूर्वी कुठलीही आर्थिक मदत न देणे येथे शासनाचा विरोधाभास दिसून येतो दिवाळीपूर्वी शासनाने कुठलीही आर्थिक मदत न दिल्याने शेतकरी शेवटी आहे त्या भावामध्ये आपल्याकडील कापूस किंवा सोयाबीन विकून अशीतशी दिवाळी साजरी करत आहेत शेतकऱ्यांना मात्र दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी तडजोड करूनच आपली दिवाळी साजरी करावी लागणार एवढे निश्चित
